Sunil Kedar : सुनील केदार यांना धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात निर्णय येण्याचा मार्गा मोकळा
Continues below advertisement
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिला आहे. केदार आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी अंतिम निकाल येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसे आदेशच सुप्रीम कोर्टानं सेशन्स कोर्टाला दिले आहेत. २००१ साली नागपूर जिल्हा बँकेत १५२ कोटींचा घोटाळा झाला होता. सुनील केदार तेव्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्याच नात्यानं ते या केसमध्ये प्रमुख आरोपीही आहेत. खटला अंतिम टप्प्यात असताना केदार सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा कोर्टानं सुनावणीला स्थगिती दिली. आता मात्र ही स्थगिती कोर्टानं उठवली आहे.
Continues below advertisement