Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा

Continues below advertisement

Sunil Kedar :  नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा माजी मंत्री सुनील केदार यांना रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयातून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेलं. तिथे केदार यांनी तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी इसीजी काढला असता बदल आढळून आला. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केदार यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram