Special Report Pench National Park : पेंच व्याघ्र प्रकल्पाची आता नवीन ओळख ABP Majha
नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्प आता 'आंतरराष्ट्रीय डार्क स्काय पार्क' झाला आहे. विशेष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी 'डार्कस्काय सेंचुरी' ठरली आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प आता वन्यप्रेमींसह खगोलप्रेमींसाठी आकर्षणाचा खास केंद्र बनणार आहे. पाहूया यावरचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
हे व्हिडिओ देखील पाहा
Pravara River SDRF Boat : प्रवरा नदीत मोठी दुर्घटना! SDRF ची बोट बुडाली, तिघांचा मृत्य
उजनी धरणात (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचनक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले. बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सुसाट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं. यावेळी बोटीत सात जण होते. यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काढ गाठलं मात्र सहाजण पाण्यात बुडाले. डोंगरे यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली आणि ही घटना समोर आली. त्यानंतर NDRF पथकाकडून शोध सुरु झाला. तब्बल 15 तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडले नाही. मात्र त्यानंतरही शोध सुरुच ठेवला अखेर 17 तासांनी बोट सापडली. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती.