ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

दुष्काळसदृष्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथील करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती, तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक

बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित 

अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग; 

अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना

उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले, ४० तासांनी उजनीतील शोधकार्य थांबलं

पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस निवडणुकी दरम्यान केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने विचारणा

बंडखोर विशाल पाटलांची सांगलीतील काँग्रेसच्या स्नेहभोजनात हजेरी, ठाकरे गट आक्रमक, सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी

करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला दुखापत, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारीने पटकावलं सुवर्णपदक, पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा  प्रकारातील एफ-४६ गटात आशियाई विक्रम

शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता, अकरावी आणि बारावीला इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर 

रायगडमधील १०३ गावांना दरडीचा धोका,  अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram