Nagpur Unlock 1.0 | नागपूरमध्ये सम-विषम फॉर्म्युल्याने दुकानं सुरू, दुकानदारांचा संभ्रम दूर
आजपासून राज्यात मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व दुकानं सुरू कऱण्यात आली आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकानं खुली असतील. यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूची दुकानं तर विषम तारखेला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायलरुम बंद राहणार आहेत. दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदारांनी घ्यायची आहे. खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते असेही नवीन नियमात नमूद केले आहे.