CM & Pawar Meet | मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवारांची वर्षा निवासस्थानी बैठक, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चेची शक्यता

कोकणातील दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. बैठकीत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. वादळाचा फटका बसलेल्या लोकांना पुन्हा कसं उभं करायचं यावर चर्चा झाली.
सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि मदतीबद्दल दोन्ही नेते बोलले. कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबतही उपाय योजना करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola