Nagpur Accident | नागपूरमध्ये स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडलं | ABP Majha
शाळेतून घरी सोडणाऱ्या स्कूलबसनेच बसमधून खाली उतरलेल्या विद्यार्थ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. स्कूल बस चालकाचा निष्काळजीपणा आणि स्कूल बसमध्ये सहाय्यक नसल्यानं आठ वर्षीय यश मिश्राला आपला जीव गमवावा लागलाय. यश मिश्रा हा ऑरेंज सिटी हायस्कूलमध्ये शिकत होता. दुपारी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून घरी परतत होता. बजेरीया चौकात यश बसमधून खाली उतरला मात्र त्याचवेळी चालक प्रफुल्ल मथुरे यांनं निष्काळजीपणानं बस पुढे नेली. आणि याच बसखाली यश आल्यानं तो चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या स्कूलबसमध्ये सहाय्यक नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे सहाय्यक असता तर हा अपघात टळला असता आणि यशचे प्राण वाचले असते.