Samruddhi Mahamarg : 3 महिन्यांचं काम दीड महिन्यात,नागपूर-शिर्डी दरम्यान वनोजा ते वारंगी रस्ता खुला
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर नागपूर शिर्डी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र वाशिम जिल्ह्यातील वनोजा ते वारंगी दरम्यान असलेल्या 12 किलोमीटर रस्त्याचं काम अपूर्ण राहिलं होतं.. या कामाला पुर्ण होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार होता, मात्र ते काम अवघ्या दीड महिन्यात पूर्ण करून शिर्डी नागपूर मार्ग सुरळीत सुरू करण्यात आला असून तो नागरीकांसाठी खुला झालाय.