RTMNU Nagpur University Exams cancels : अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानंतर आता नागपूर विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत... अतिवृष्टी आणि पुरामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या नागपूर, गोंदिया, भंडारा, आणि वर्धा या चार जिल्ह्यांसाठी निर्णय लागू असणार आहे. चार दिवसांपासून विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलंय आजही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.