Rakshabandhan Special : राजकीय गडबडीतही रक्षाबंधन साजरा करण्यात नेते रमले
राज्यात राजकीय गडबड गोंधळ असतानाही आज राजकीय नेत्यांनी आपल्या भगिनींसाठी आणि भावांसाठी थोडा वेळ काढलाच.... आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय नेत्यांनीही पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन साजरं केलं... मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांना त्याच्या भगिनींनी राखी बांधली. तिकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार प्रसाद लाड यांना औक्षण केलं... रुपाली चाकणकर यांनीही आपल्या भावांचं औक्षण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला... तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भगिनींनीरी रक्षाबंधनानिमित्त मुंबई गाठत भावाच्या मनगटावर राखी बांधली