RSS ची Nagpur मध्ये आजपासून बैठक, संघ परिवारातील 36 संघटना बैठकीत सहभागी होणार
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात आजपासून दोन दिवसीय बैठक आजपासून संघ परिवाराची अखिल भारतीय समन्वय बैठक नागपुरात सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघ परिवारातील सर्व 36 संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. संघ परिवारातील विविध संघटनांनी गेल्या काही महिन्यात केलेल्या कामाचा आढावा या वार्षिक पातळीवर होणाऱ्या बैठकीत घेतला जातो. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे उपस्थित राहणार आहे. शिवाय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि संघटन मंत्री बीएल संतोष हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement