Ramtech Krushi Utpanna Bazar Samiti : रामटेकमध्ये सुनील केदार यांनी काँग्रेविरोधातच उभं केलं पॅनल
नागपूर जिल्ह्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील केदार यांच्या गटाने काँग्रेसच्याच एका गटाच्या विरोधात पॅनल उभे केलंय.. सुनील केदार यांच्या गटाने रामटेकचे शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांच्या गटासोबत हातमिळवणी करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत सुनील केदार व आशिष जैस्वाल यांचे सहकार पॅनल रिंगणात आहे तर काँग्रेसचे शेतकरी आघाडी पॅनल रिंगणात आहे. महत्वाची बाब म्हणजे आमचं पॅनेल काँग्रेसचं अधिकृत पॅनेल आहे, असा दावा दोन्ही गट करतायत..