Rajkumar Badole Join NCP : भाजपचा बडा नेता ; विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली

Maharashtra Assembly Election 2024 भंडारा : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. अशातच तुमसरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare)  यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश केल्यानं त्यांनाचं उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या तुमसरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोष व्यक्त होत आहे. भंडाऱ्यात महाविकास आघाडीची उमेदवारी चरण वाघमारे यांना मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडी विरोध दर्शविताना भंडाऱ्याच्या तुमसरात कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. 

विदर्भात अजित पवारांना ताकद वाढणार 

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भात बळ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola