Raj Thackeray Vidarbha Daura : राज ठाकरे यांनी हट्ट पुरवलेला चिमुकला 'माझा'वर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीचं जनसामान्यांमध्ये प्रचंड आकर्षण आहे.. मात्र चिमुकल्यांवरही राज यांच्या व्यक्तीमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे.. याचीच प्रचिती राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यात आली... राज ठाकरेंना भेटायचंच आहे असा हट्ट करुन एक चिमुकला आजीला घेऊन आला.. राज ठाकरे जिथे थांबले आहेत त्याच हॉटेलमध्ये काही न खातापिता तो थांबला होता... मनसैनिकांनी त्याला दुपारी येण्यास सांगितलं... मात्र चिमुकला काही हटायला तयार नव्हता.. मनसैनिकांनी याबाबतचा निरोप राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला...त्यानंतर राज ठाकरे यांनी या चिमुकल्यापर्यंत निरोप पाठवला.. आधी नाश्ता कर मग भेटून ऑटोग्राफ देणार असा निरोप राज ठाकरे यांनी या चिमुकल्याकडे पाठवला.. त्यानंतर रवीभवनकडे बैठकीसाठी जाण्याआधी राज ठाकरे यांनी आधी या चिमुकल्याची भेट घेतली.. त्याला ऑटोग्राफही दिला... अशाप्रकारे राज ठाकरेंनी चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. हा चिमुकला आणि त्याच्या आजीशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola