
Nagpur Lockdown | नागपुरात लॉकडाऊनवरून प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी, मुंढेंचा लॉकडाऊनचा इशारा
Continues below advertisement
दोन दिवसांच्या जनता कर्फ्युमध्ये उत्तम स्वयंशिस्त दाखवणाऱ्या नागपूरकरांना आता पुढे काय याची उत्सुकता लागली आहे. कडक लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी आणि छोटे दुकानदार धास्तावले आहेत. तर अनेक लोकप्रतिनिधींनी रोज कमावून खाणाऱ्या कष्टकरी वर्गाचा प्रश्न उपस्थित करत आधी त्यांच्या जेवणाची सोय महापालिकेने करावी नंतरच लॉकडाऊनचा विचार करावा अशी सूचना केली आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात सातत्याने महापालिका प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना पाहणाऱ्या नागपूरकरांना लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आणखी एका नव्या वादाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Nagpur Dispute Nagpur Politics Nagpur Lockdown Tukaram Mundhe Dispute Nagpur Municipal Corporation Tukaram Mundhe Nagpur Special Report