PM Narendra Modi Nagpur Sabha : नागपुरातील कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 04:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi Nagpur Sabha : नागपुरातील कन्हानमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा होणार आहे. कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची ही मोदीची एकत्रित सभा असणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक या सभेत येतील असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, मोदींच्या सभेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे... कन्हानमधील ब्रुक बाँड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकराच्या आवारात ही सभा होणार असून पोलिसांनी मंगळवारपासूनच सभास्थानाचा पूर्ण ताबा आपल्याकडे घेतला आहे.