Nagpur Over Bridge : समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांसाठी ओवर ब्रिज, अंडरपासेस मार्ग
नागपूरपासून मुंबईपर्यंत सातशे किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांसाठी खास कॉरिडोर करण्यात आलंय... समृद्धी महामार्ग तीन अभयारण्यातून जात असून मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांची उपस्थिती असलेले भाग समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहेत. वन्य प्राण्यांना सुरक्षितरीत्या समृद्धी महामार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हे खास कॉरिडोर बनवण्यात आले आहे.. नागपूरपासून मुंबईपर्यंत नऊ ठिकाणी ओवर पासेस म्हणजेच ओवर ब्रिज वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आले असून सतरा ठिकाणी अंडरपासेस म्हणजेच समृद्धी महामार्गाच्या खालून वन्यप्राण्यांसाठीचे कॉरिडोर आहेत...
Tags :
Nagpur Samriddhi Highway MUMBAI Seven Hundred Kilometers Wildlife Corridor Presence Of Wild Animals Over Passes