Medicines for Cold/Cough | सर्दी, खोकल्याच्या औषधासाठीही चिठ्ठी लागणार, नागपूरमध्ये नवी नियमावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या संशयित रुग्णांना सर्दी, खोकला आणि तापाचे लक्षणे असतात, मात्र लोकं त्यास साधारण व्हायरल ताप आणि मोसम बदलल्यामुळे होणारं सर्दी खोकला मानून औषधे घेतात. अनेक मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं सहज मिळतात आणि त्यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण पुढील काही दिवसात योग्य औषधोपचाराशिवाय जास्त गंभीर होतात. तसेच स्वतःहून औषध घेतल्याच्या कालावधीत ते स्वतःला योग्यरीत्या आयसोलेट करत नसल्यामुळे संक्रमणाचा फैलाव ही होतो.