Bageshwar Dham : धीरेंद्र महाराजांवर कुठलाही दखलपात्र गुन्हा दाखल करणार नाही : अमितेश कुमार
बागेश्वर धामच्या धीरेंद्र महाराजांना नागपूर पोलिसांनी क्लीनचिट दिली का?, असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या कार्यक्रमाचे सहा तासांपेक्षा जास्त फुटेज तपासले असून, ते अंधश्रद्धा पसरवत असल्याचं जाणवत नाहीय, त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही दखलपात्र गुन्हा दाखल करणार नसल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.