Nitin Raut यांच्या मुलावर मोक्कात फरार आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप, अभिषेक सिंह दीड वर्षापासून फरार
Continues below advertisement
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे सुपुत्र कुणाल राऊत हे मोक्कामध्ये फरार असलेल्या एका आरोपीला गेल्या दीड वर्षापासून आश्रय देत असल्याचा आरोप करण्याता आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी हा आरोप केला आहे. अभिषेक सिंह हा आरोपी गेल्या दीड वर्षापासून नागपुरातून फरार आहे. मात्र, हा आरोपी देशातील अनेक शहरात नितीन राऊतांचे सुपुत्र कुणाल राऊत यांच्यासोबत फिरत असल्याचं ज्वाला धोटेंनी म्हटलंय.. या संदर्भातले काही फोटो आणि पुरावे ज्वाला धोटे यांनी पोलिसांना दिले आहेत. या संदर्भात नितीन राऊतांना विचारले असता त्यांनी ज्वाला धोटेंचे आरोप फेटाळले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nagpur MCOCA Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Kunal Raut Abhishek Singh Maharashtra Control Of Organised Crime Act