Nitin Gadkari Threat : गुन्हेगार जयेश पुजारीच्या नावाने नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन.. एबीपी माझा ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीप्रमाणे आज सकाळी दोन वेळेला गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले... धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा त्याच जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले... त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली... वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे..
Continues below advertisement