Nitin Gadkari : रोखठोक नितीन गडकरींचे फडणवीसांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना फटकारे
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रोखठोक शैलीतील वक्तव्याचे फटकारे आज देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांना सोसावे लागले. फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात आज ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस हे दोन्ही नेते उपस्थित होते. तेव्हा दक्षिण नागपूरमधल्या नगरसेवकांनी चांगलं काम केल्याचं सांगत गडकरींनी त्यांना ९० गुण दिले. तर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील नगरसेवकांना मात्र १०० पैकी ५० गुणच देता येतील असे खडे बोल त्यांनी सुनावले.... दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS