नागपूर : LPG, CNG नंतर आता LNG, देशातील पहिलं LNG फिलिंग स्टेशन, नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
नागपूर : देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल आणि त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले. देशातील पहिल्या LNG फिलिंग स्टेशनचे उदघाटन आज नागपुरात नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. औषध क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या बैद्यनाथ समूहाने हे LNG फिलिंग स्टेशन "B-LNG" या नावाने नागपूरच्या आऊटर रिंगरोडवर सुरु केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement