दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पंकजा मुंडे,विनोद तावडेंसह मोठे नेते मोदींच्या निवासस्थानी
Continues below advertisement
नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेश आणि इतक निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्ली दरबारी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. याचाच भाग म्हणून आज (रविवार 11 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह मोठे नेते मोदींच्या निवासस्थानी पोहचले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप नेते बीएल संतोष यांचीही उपस्थिती या बैठकीला राहणार आहे.
Continues below advertisement