Nagpur : नागपुरात नाईट विथ आझादी उपक्रम सुरु, महिलांवरील बंधनांना विरोध
रात्रीच्या वेळेस महिलांनी घराबाहेर निघण्याबद्दल अनेक बंधन असतात... रात्रीची वेळ महिलांनी बाहेर जाणं सुरक्षित नाही असा समज करून ही बंधनं घातली जातात... मात्र नागपुरात काही महिलांनी एकत्रित येऊन या समजुतीला तडा देण्याचे ठरवले आहे.. त्यासाठी या महिलांनी मध्यरात्री घराबाहेर निघून फिरण्याचे ठरवले असून त्यांच्या या उपक्रमाला नाईट विथ आजादी असे नाव देण्यात आले आहे... सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाउंडेशन नावाच्या संस्थेने हे उपक्रम राबवले असून या उपक्रमात आज मध्यरात्री काही धाडसी महिला नागपूरच्या शंकर नगर परिसरात एकत्रित येऊन चहाच्या कट्ट्यावर भेटल्या