MLC Elections : राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रदीप साळुंखे नॉट रिचेबल, मविआ उमेदवाराच्या अडचणीत वाढ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता विभागाचे राज्याचे प्रमुख प्रदीप साळुंखे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. आज शेवटच्या दिवशी ते उमेदवारी अर्ज मागे घेतात का यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद येथील स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रदीप सोळुंके हे सध्या नॉट रिचेबल आहेत त्यामुळे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांची अडचण थोडी निर्माण होईल अशी शक्यता दिसते आहे.