NCP Crisis : राष्ट्रवादीचं विधिमंडळ कार्यालय कुणाला? विधिमंडळ प्रशासनासमोर पेच

 येत्या 7 डिसेंबर पासून विदर्भात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या निमित्य विधानभवन  परिसरात सर्वच राजकीय पक्षाला कार्यालय मिळत असते. शिवसेना पक्षात फूट पडल्या नंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरात दोन गटाला दोन स्वतंत्र कार्यालय देण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पण दोन गट पडले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये  फूट पडली असे त्यांचे नेते म्हणत नाही. दोन्ही गट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून विधान भवन परिसरातील कार्यलय आमचेच असल्याचा दावा करत आहे. मात्र निवडणूक आयोगात याचा वाद सुरु असून अद्यापर्यंत राष्ट्रवादी कुणाची यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला नागपूरच्या विधानभवन परिसरातील हे मूळ कार्यालय द्यायचे हा प्रश्न विधिमंडळ प्रशासनाल पडला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola