Satish Uke : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंना ईडीकडून अटक, व्यवहारांप्रकरणी कारवाई
नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. वकील सतीश उके यांच्या घरी आज सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरु होती त्यानंतर डीनं सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय.