Nagpur ZP Office Reality Check : नागपूर 'झेडपी'तले लेटलतीफ माझाच्या कॅमेऱ्यात कैद

बातमी आहे सरकारी कार्यालयातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांची.... पाच दिवसांचा आठवडा असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ पावणे दहा वाजता सुरु होते. त्यांनी साडे नऊ वाजता कार्यालयात पोहोचून पावणे दहा वाजता रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. पण नागपूरच्या जिल्हा परिषद कार्यालयात एबीपी माझानं पडताळणी केली तेव्हा ५० टक्के कर्मचारी सव्वा दहा वाजले तरी कार्यालयात पोहोचत होते. काही लेटलतीफ तर साडे दहा वाजल्यानंतर कार्यालयात पोहोतले. एबीपी माझाचा कॅमेरा पाहून काही कर्मचाऱ्यांनी फोनाफोनी सुरु केली. अनेकजण कॅमेरा चुकवून कार्यालयात जाण्यासाठी धडपड करत होते.... आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयात केलेली रिअॅलिटी चेक पाहुयात.... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola