Nagpur : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनवण महागात, तरुण अटकेत
नागपूरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय मुलानं युट्यूब पाहून बॉम्ब तयार केला. परंतु, निकामी करता न आल्यानं त्याची पंचायत झाली. त्यानंतर त्यानं एक शक्कल लढवून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी बॉम्ब पथक पाचारण करुन बॉम्ब निकामी केला आणि याप्रकरणी अधिक तपास सुरु केला. त्यावेळी तरुणानं हा प्रकार केल्याचं उघड झालं. नागपूर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.