Nagpur Clash Market loss : नागपूर हिंसाचारात तीन दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचं

Continues below advertisement

नागपुरात काही भागातील संचारबंदी हटवली असली तर अनेक भागात अजूनही कायम आहे. या संचारबंदीमुळे मध्य नागपूरातील बाजार बंद असल्याने गेल्या तीन दिवसात सुमारे ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, इतवारी, गांधीबाग, सीए रोड या सर्व भागात नागपुरातील अत्यंत महत्त्वाच्या बाजारपेठा आहे. मात्र संचारबंदीमुळे बहुतांशी बाजार बंद असल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होतंय. शिवाय या बाजारांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांचा रोजगारही बुडाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळले आहे.

नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी

उपराजधानी नागपूर शहरात दोन गटांत उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 34 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांकडून अद्यापही कारवाई सुरू असून या घटनेतली म्होरक्या किंवा मास्टरमाईंड फहिम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. अशातच नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानांकडून करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola