
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 20 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स
दिशा सालियान प्रकरणावरुन आज सभागृहात चांगलाच वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणावर जोरदार खडाजंगी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजुने मैदानात उतरले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळाल्या. महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधीपक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबू नका, असे म्हणत अनिल परब यांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला. त्यानंतर, चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी संताप व्यक्त करत, मी 56 परब पायाला बांधून फिरते, असे म्हटले.
संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याचे उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली,असेल हिंमत तर विचारा त्यांना, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला. तसेच, माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी अनिल परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित, माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं, तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते, आम्ही वशिल्याने इथं आलेलो नाही आहोत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.