Nagpur : नागपुरात राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांचा मृत्यू, कारण काय?
Continues below advertisement
नागपुरात राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्याना बर्ड फ्लूचं संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.. बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय... एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळ मधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले..त्यानंतर अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे सिद्ध झाले.. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला..तर संबंधित पोल्ट्री फार्म मधील 8 हजार 501 कोंबड्यांचं कलिंग म्हणजेच कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली...
Continues below advertisement