Nagpur Thermal Power Station : नागपुरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच बंद

Continues below advertisement

Nagpur Thermal Power Station : नागपुरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच बंद  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान मंगळवारी ‘बाॅयलर ट्युब लिकेज’मुळे महानिर्मितीच्या नागपुरातील खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावाॅटचा संच बंद पडला. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा संच बंद पडल्याचा कृती समितीचा दावा असला तरी प्रशासनाने तो फेटाळला आहे.  महानिर्मितीची राज्यभरातील स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२.०६ मेगावाॅट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत निर्मितीचा वाटा ७५ टक्के म्हणजे ९ हजार ५४० मेगावाॅट आहे. नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची स्थापीत क्षमता १ हजार ३४० मेगावाॅट आहे. या प्रकल्पात सध्या २१० मेगावाॅटचे ४ संच, ५०० मेगावाॅटचा १ संच आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram