Nagpur Shivsainik Celebration : संजय राऊतांच्या जामीनाच्या बातमीनंतर नागपुरात ठाकरे गटाचा जल्लोष
आज आमचा सरदार, आमच्या सेनापती बाहेर आला आहे.. या लढाईत त्यांची आम्हाला गरज होती.. त्यांना कट करून आत टाकण्यात आले होते... न्यायदेवतेने न्याय केलं आहे.. त्यामुळे आज प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आनंद आहे आणि डोळ्यात आनंदाष्रू आहे अशी प्रतिक्रिया
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर नागपुरातील शिवसैनिकांनी दिली आहे... नागपुरातील महाळगी नगर चौकात आज शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला... यावेळी शिवसैनिकांनी मशाल पेटवून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केले... विशेष म्हणजे याच म्हाळगी नगर चौकापासून काही अंतरावर असलेल्या गजानन नगर मध्ये काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी जाहीर सभा घेत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याची आणि भाजपला नागपूर महानगरपालिकेतील सत्तेतून बेदखल करण्याची शपथ घेतली होती..