Nagpur: 'समृद्धी' मार्गात शाळेची विहीर, पटांगण गेलं, गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन ABP
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आज अमरावतीतल्या प्रश्नचिन्हं शाळेतील विद्यार्थ्यांनी आज आगळं आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा गावात "प्रश्नचिन्ह" अशी पारधी समाजातील मुलांची निवासी शाळा आहे... समृद्धी महामार्गाच्या कामात या शाळेची बारमाही विहीर, पटांगण, वाचनालय, स्वच्छता गृह गेले आहेत... समृद्धीच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी शाळेच्या या सर्व सोयी तोडून टाकल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे... त्यामुळे शाळेच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी आज शिक्षक आणि पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत नागपूर गाठलं आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर प्रतीकात्मक शाळा भरवून आगळेवेगळे आंदोलन केले.... विद्यार्थी आंदोलन करत असल्याचं समजल्यानंतर गडकरीही त्यांच्या भेटीसाठी खाली आले. समृद्धी मार्गाचं काम राज्य सरकारशी निगडीत असल्याचं सांगून संबंधित मंत्र्यांना पत्र लिहिण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.