Marriage Issue | विदर्भातील शेतकरी मुलांना नवरी मिळेना | नागपूर | ABP Majha

Continues below advertisement

सध्या लग्नसराईचं सिझन सुरु झालंय. अनेक ठिकाणी सनई चौघेडे वाजत आहेत, पण नागपूर जिल्ह्यातील सुसुंद्री गावातील तरुणांना नवरी मिळेना झालीय.
या गावातील प्रमुख व्यावसाय शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुलगी द्यायला कुणीही तयार होत नाही.
सुसुंद्री गावात 70 तरुण आहेत. त्यापैकी तब्बल पन्नास मुलांना मुलींनी नकार दिलाय. कारण ते शेती करतात.
कमी पगार असेल तरीही चालेल पण ठराविक मासिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदाराला मुलींची जास्त पसंती आहे.
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये हीच स्थिती आहे.
शेतीमध्ये वडिलांसोबत काम करताना मुलींनी अडचणी पाहिल्या आहेत शिवाय शेतात धोके जास्त आणि नफा कमी....निसर्गाच्या लहरीपणा...यामुळे मुलींची शेतकऱ्यांनी पसंती नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram