Nagpur Vaccine : नागपूरामध्ये 1 डिसेंबरपासून कोविड लसीचा पहिला डोस विकत घ्यावी लागणार...
नागपूरात एक डिसेंबरपासून कोविड लसीच्या पहिल्या डोजसाठी पैसे मोजावे लागणार आहे. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोज पैसे देऊन मिळणार आहे... नागपूर शहरात अजूनही 2 लाख 70 हजार नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोज घेतलेला नाही. नागपूर महानगर पालिका हद्दीत 18 वर्षावरील 19 लाख 63 हजार नागरिक आहेत. त्यापैकी 16 लाख 92 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोज घेतला आहे... उर्वरित 2 लाख 70 हजार नागरिक अद्यापही लसीकरण केंद्रांकडे फिरकलेले नाहीत. हेच 2 लाख 70 हजार नागरिक नागपुरात तिसर्या लाटेचा कारण तर ठरणार नाही ना अशी भीती महापालिकेला आहे. तसेच तिसरी लाट पसरल्यास लस न घेतलेले हेच 2 लाख 70 हजार लोक संक्रमणाबद्दल सर्वाधिक धोक्यात असतील अशी शंका महापालिकेला आहे.. त्यामुळे तिसऱ्या लाटेला टाळण्यासाठी ह्या 2 लाख 70 हजार नागरिकांना लस देणे गरजेचे आहे हे ओळखूनच महापालिकेने 30 नोव्हेंबर पर्यंत या नागरिकांना लस लावण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे तसेच एक डिसेंबर नंतर लसीचा पहिला डोस घ्यायला येणाऱ्या कडून पैसे घेतले जाईल असेही महापालिकेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे लस न घेणाऱ्या 2 लाख 70 हजार नागरिकांमध्ये काही विशिष्ट समाजातील नागरिक जास्त आहेत... त्यांच्या धर्मगुरूंचे माध्यमातून महापालिका जनजागृती करून त्यांना लस घेण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न करत आहे.