Nagpur Rain Update : नागपूर शहरात एक हजार कोटींचं नुकसान,शाळांना आज सुट्टी : ABP Majha

Continues below advertisement

बुलेटिनची सुरवात करूया महापुराच्या बातमीने.. नागपूर शहरात पहाटेपासून पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. कारण पहाटे २ पासून शहरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. ४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे नाग नदीचं पाणी अनेक भागांत शिरलं. तसेच, शहरात जवळपास ४०० जणांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे.  पूर परिस्थितीमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. मीराबाई पिल्ले आणि संध्या ढोरे असं मृत महिलांचं नाव आहे. संध्या ढोरे या सुरेंद्रगड परिसरात राहायच्या. त्यांना अर्धांगवायू झाला होता. त्या घरी जमिनीवर झोपल्या होत्या. त्यातच पुराचं पाणी घरात शिरलं, आणि त्यातच बुडून त्यांचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं, तसंच शेकडो वाहनं देखील पाण्याखाली गेली होती. हे पाणी आता ओसरण्यास सुरुवात झाली.. दरम्यान, नागपूर शहरापेक्षा शहराबाहेरील वाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, आणि इथं नाग नदीचा छोटा प्रवाह वाहतो. त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram