Shaikh Subhan Ali : शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन

Shaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन 

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या शेख सुभान अली  आणि त्याची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा...  नागपुरात सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित निषेध आंदोलन करत केली मागणी...  कथित शिवचरित्रकार शेख सुभान अली विरोधात नागपुरात जोरदार आंदोलन करण्यात आले... महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकावर सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन शेख सुभान अली याच्या छत्रपती शिवाजी महाराजां संदर्भातल्या वक्तव्यांचा विरोध केला...   दोन दिवसांपूर्वी दंगल मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागपूरच्या गोळीबार चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत शेख सुभान अली यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनासंदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केले होते... महाराजांचा स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रावर मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर फडकला होता... शिवाजी महाराजांचे मुस्लिम गुरु होते... यासह शेख सुभान अलीच्या अनेक वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते... त्यानंतर आज नागपूरातील सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येत शेख सुभान अली यांच्या वक्तव्यांचा विरोधच केला नाही, तर पोलिसांनी दंगल मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या आयोजकां विरोधात तसेच शेख सुभान अली विरोधात गुन्हा दाखल करावं अशी मागणीही केली आहे... राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करू नये अशी मागणीही शिवप्रेमी संघटनांनी केली आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola