Nagpur Police Action Mode : पुण्यातील दुर्घटनेनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; बार, पब्सना इशारा

पुण्यातील कल्याणीनगर येथील मद्य प्राशन आणि अपघातात दोघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी बियर बार, पब आणि नाईट क्लब बद्दल कडक पावले उचलली आहे... शहरात बार, पब आणि नाईट क्लब मध्ये मध्य प्राशन करणारे अरेरावी किंवा भांडण करत असतील, तसेच बाहेर निघून त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होणार असल्याची शक्यता वाटल्यास बार आणि पबच्या व्यवस्थापनाने त्वरित पोलिसांना माहिती द्यावी अशी अपेक्षा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली आहे.. तसेच बार पब आणि नाईट क्लब मध्ये पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन करावा असे ही पोलीस आयुक्तांनी बजावले आहे.. दरम्यान काही पब आणि बारमध्ये नियमांचा उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी आठ बार आणि तीन रूफ टॉप रेस्टॉरंटवर गेल्या काही दिवसात कारवाई किल्ल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola