Nagpur Lockdown | पाहा, नागपूरमध्ये कसा बळावतोय कोरोना;प्रशासनाचे आदेश आणि कोरोनाच्या नियमांना हरताळ
आता संपूर्ण देशात महाराष्ट्राची परिस्थिती बिकट असताना जरा नागपूरचं चित्र पाहा. नागपुरात कोरोनाचा आकडा वाढतोय आणि त्यामुळे प्रशासनानं 15 मार्च ते 21 मार्चदरम्यान लॉकडाऊनची घोषणा केलीए. पण नागपुरकरांनी प्रशासनाचे आदेश आणि कोरोनाचे नियम यांना हरताळ फासलाय. नागपूरकरांनी सगळ्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. नागपूरची सर्वात मुख्य बाजारपेठ सीताबर्डी मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळतेय़.