Nagpur : संतापजनक! भूतबाधा झाल्याच्या शंकेने आईबापाकडून मुलीला मारहाण; चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

नागपूरः आपल्या सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली.या जबर मारहाणीत त्या सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात प्रतापनगर पोलिस स्ठानकात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. याला कंटाळून शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola