Nagpur MVA Sabha : मविआच्या सभेच्या ठिकाणावरुन भाजपात मतप्रवाह?
नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात होणार आहे. 16 एप्रिलला ही सभा होणार आहे. नागपुरातील सुधार प्रण्यास मैदानात सभा घेण्याचं निश्चित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर महविकास आघाडी सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहे.