Nagpur : फेरीवाल्यांचं साहित्य चक्क जमिनीत पुरलं; नागपूर मनपाचं संतापजनक कृत्य
नागपुरात सुरू असलेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे रस्ते नीटनेटके दिसावे, रस्त्यावर अतिक्रमण दिसू नये यासाठी महानगरपालिकेकडून गेले काही दिवस फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात आहे... मात्र ही कारवाई करताना सर्व मर्यादा ओलांडत अतिशय संतापजनक कारवाई केली...
अतिक्रमण विरोधी पथकानं या फेरीवाल्यांचं साहित्य चक्क जमिनीत पुरून टाकल्याचा आरोप करण्यात येतोय.. एकढंच नाही तर त्यावर माती टाकून जेसीबी देखील फिरवण्यात आला. यामुळे या फेरीवाल्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालंय.