Nagpur MLC Election : नागपुरात नागो गाणार, सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने समर्थन दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार, महाविकास आघाडीने पाठींबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व 124 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झालीये..