Nagpur : अनुसूचित जातींचं 13% आरक्षण चार वर्गात विभागून देण्याची हिंदू दलित महासंघाची मागणी
Continues below advertisement
राज्यात अनुसूचित जातींसाठी असलेलं 13 टक्के आरक्षण अ, ब, क, ड ( VJNT प्रमाणे ) अशा चार वर्गात विभागून द्यावे अशी मागणी हिंदू दलित महासंघाने केली आहे. अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणाचा बहुतांशी लाभ फक्त एका विशिष्ट जातीला मिळत असून राज्यात अनुसूचित जाती मध्ये असलेल्या 59 पैकी उर्वरित 58 जातीतील नागरिकांना राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणाचा तेवढा लाभ मिळत नसल्याचे मत हिंदू दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले आहे. नुकतंच नागपुरात हिंदू दलित महासंघाची राज्यव्यापी बैठक पार पडली.
Continues below advertisement