Nagpur : 'नासा'मध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, नोकरीच्या नावाखाली 5 कोटी 31 लाख 70 हजार लुबाडले

Continues below advertisement

'नासा' या संस्थेमध्ये नोकरी मिळवणं जगभरातील तरुणांचं स्वप्न असतं. मात्र, नागपुरातील एका भामट्याने नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एक-दोन नव्हे तर तब्बल 111 जणांची फसवणूक केलीय. ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्याचं नाव असून ओमकारने या 111 जणांकडून तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपये लुबाडले. नासाचं खोटं लेटरहेड बनवून त्यानं या तरुणांना अपॉईंटमेंट लेटरही दिलं होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ओमकारने एका आठवड्यापूर्वी नागपूरच्या दोन व्यापारांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ओमकारला नागपूर पोलिसांनी अटक केल्यावर नासा नोकरी प्रकरणात फसवणूक झालेल्या काहींनी हिंमत जुटवून नागपूर पोलिसांत तक्रार केली. तेव्ही या ओमकारचे अन्य कारनामे पोलिसांसमोर आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram