Nagpur Flood : नागपूरचा पूर संपूर्णपणे मानवनिर्मित? माझाचा रिअॅलिटी चेक
नागपूरमध्ये शनिवारी पहाटे अचानक पूरस्थिती का निर्माण झाली, या मागोवा एबीपी माझा घेतंय. पूरस्थितीमागच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक कारण समोर आलंय, आणि ते म्हणजे शासकीय यंत्रणांच्या विविध विकासकामांमुळे नाद नदीच्या प्रवाहाला जागोजागी अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नदीनं आपला प्रवाह बदलल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सीताबर्डी, धांतोली मार्केटमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी