Nagpur Cobra Parcel : कुरियर बॉक्समधुन निघाला कोब्रा! नागपुरातील धक्कादायक घटना !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण कुरियरने किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवतो. बॉक्समध्ये पॅकिंग करुन या वस्तू आपल्या घरी येतात. मात्र याच बॉक्समधून वस्तूऐवजी कोब्रा निघाला तर.... नागपुरातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सुनील लखेटे यांच्यासोबत असंच काहीसं घडलं. लखेटे यांची मुलगी बंगळुरुमध्ये नोकरीला आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ती नागपुरातील घरातूनच काम करतेय. त्यामुळे लखेटे यांनी बंगळुरुमधील घर मुलीचं रिकामं केलं. तिथल्या एका परिचित व्यक्तीच्या माध्यमातून आठ बॉक्समध्ये सामान पॅक करुन नागपूरला मागवलं. बंगळुरुहून हे 8 बॉक्स कुरियर कंपनीच्या गोदामात होते. तिथून हे बॉक्स काल संध्याकाळी लखेटे यांच्या घरी पोहोचले. मात्र एक बॉक्स उघडला असता त्यातून कोब्रा बाहेर पडला. त्यानंतर एकच पळापळ झाली. लखेटे कुटुंबीयांनी तो बॉक्स बाहेर नेला. तिथून हा कोब्रा नाल्यात गेला. सर्पमित्रांनी कोब्राला शोधण्याचा प्रयत्न करुनही तो सापडला नाही. मात्र हा कोब्रा बॉक्समध्ये कसा आला हे अद्याप समजू शकलं नाही,